श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साधनेतून २९ फेब्रुवारी १९५६ रोजी पृथ्वी तत्त्वामध्ये 'अतिमानस चेतने'चे आविष्करण झाले. या निमित्ताने अधिमानस म्हणजे काय? अतिमानस म्हणजे काय? चेतनेची उत्क्रांती ही काय संकल्पना आहे, यासारख्या गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न या मालिकेमध्ये करण्यात आला आहे. अतिमानसाचे आविष्करण म्हणजे Supramental manifestation.
नऊ भागांची ही मालिका आहे. अभ्यासक डॉ. केतकी मोडक यांनी ही विषयमांडणी केली आहे.