मनाच्या वर असणाऱ्या उच्चतर स्तरांचे ज्ञान आणि त्याचे सांगोपांग विवेचन हे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे अध्यात्मशास्त्राला, तत्त्वज्ञानाला असलेले योगदान आहे. आजच्या भागामध्ये आपण सामान्य मानवी मन ते अधिमानस (Overmind) या दरम्यानच्या स्तरांचा विचार करणार आहोत. अभ्यासक डॉ. केतकी मोडक यांनी या विषयाची मांडणी केली आहे.