मनुष्य स्वत:च्या प्रयत्नांनी ज्या उच्च श्रेणीपर्यंत जाऊन पोहोचू शकतो ती श्रेणी म्हणजे 'अधिमानस' असे श्रीअरविंद यांनी म्हटले आहे. आपण येथे अधिमानस (Overmind), त्याचे स्वरूप आणि त्याच्या सीमा यांचा विचार करणार आहोत. अभ्यासक डॉ. केतकी मोडक यांनी या विषयाची मांडणी केली आहे.