श्रीअरविंद आणि श्रीमाताजी पृथ्वी-चेतनेमध्ये 'अधिमानस' चेतनेचे अवतरण व्हावे यासाठी प्रयत्नशील होते. आणि २४ नोव्हेंबर १९२६ या दिवशी हे अवतरण घडून आले. ही घटना कशी घडली, त्याची पार्श्वभूमी, त्याचे परिणाम आणि श्रीअरविंद आश्रमाची स्थापना या विषयी आपण येथे जाणून घेणार आहोत. अभ्यासक डॉ. केतकी मोडक यांनी या विषयाची मांडणी केली आहे.